वचन (Number)
वचनाचे 2 प्रकार आहेत. 1)Singular Number (एकवचन).
2) Plural Number (अनेकवचन)
1) Singular Number (एकवचन) - एकाच घटकाचा ज्या नामातून बोध होतो त्यांना एकवचन (Singular Number) असे म्हणतात. उदा. Book, Pen, Pencil, City etc.
2) Plural Number (अनेकवचन) - एकापेक्षा अधिक घटकाचा ज्या नामातून बोध होतो त्यांना अनेकवचन (Plural Number) असे म्हणतात.उदा. Books, Pens, Pencils, Cities etc.
साधारणपणे एकवचनी नामाचे अनेकवचन करताना s प्रत्यय लावतात
car - cars
hat - hats
chair - chairs
pen - pens
book - books
ज्या एकवचनी नामांच्या शेवटी s, sh, ch, x किंवा z आल्यास अनेकवचन करताना es लागतो.
Bench - benches.
Box. - boxes
Match - matches
Watch - watches
Kiss - kisses
ज्या नामांच्या शेवटी y आहे व y पूर्वी एखादा स्वर आल्यास त्या नामाचे अनेकवचन करताना शेवटी फक्त s लागतो.
Boy - boys
Key - keys
Day - days
Toy - toys
Play - plays
ज्या नामांच्या शेवटी y आहे व y पूर्वी व्यंजन असेल तर त्या नामाचे अनेकवचन करताना शेवटी ies प्रत्यय लागतो.
Baby - babies
Body - bodies
City - cities
Story - stories
Copy - copies
एकवचनी नामांच्या शेवटी 'O' आल्यास अनेकवचन करताना es लावतात.
tomato - tomatoes
mango - mangoes
hero - heroes
buffalo - buffaloes
potato - potatoes
याला काही अपवाद आहेत जसे की -
photo - photos
piano - pianos
kilo - kilo
नामाच्या शेवटी दोन स्वर असल्यास अशा नामाचे एकवचन करताना s प्रत्यय लागतो
zoo - zoos
tree - trees
bee - bees
radio - radios
bamboo - bamboos
एकवचनी नामाचा शेवट f किंवा fe होत असल्यास त्याचे अनेकवचन करताना f किंवा fe काढून -ves लावतात.
leaf - leaves
life - lives
knife - knives
thief - thieves
wife - wives
याला काही अपवाद आहेत जसे की -
safe - safes
roof - roofs
proof - proofs
grief - griefs
काही नामांचे अनेकवचन करताना en किंवा ren प्रत्यय लागतो.
child - children
man - men
woman - women
ox - oxen
नामाच्या स्वरात बदल केलेले अनेकवचन पाहुया.
louse - lice
mouse - mice
foot - feet
tooth - teeth
संयुक्त नामांचे अनेकवचन करताना पहिल्या मुख्य शब्दाचे अनेकवचन करावे लागते.
son-in-law = sons-in-law
brother-in-law. = brothers-in-law
sister-in-law = sisters-in-law
man-for-war = mens-for-war
step-son = step-sons
आद्याक्षरांचे अनेकवचन s जोडून करतात.
MP - MPs
VIP - VIPs
MLA - MLAs
काही शब्दांचे एकवचन आणि अनेकवचन नामे सारखीच आहेत -
sheep - sheep
aircraft - aircraft
fish - fish
deer - deer
fruit - fruit
उदा. 1)I saw a deer. (singular)
2)Deer are grazing. (Plural)
अपवाद - नामांच्या वेगवेगळ्या जातींचा उल्लेख केल्यास वरील काही नामांचे अनेकवचन करताना s प्रत्यय लावावा लागतो.
1) Mango, Apple, Grape are fruits.
2) I brought fishes like Bangda, Paplet, Surmai etc.
भाववाचक नामांचे अनेकवचन केले जात नाही.
Courage, Honesty, Faithfulness
अपवाद - भाववाचक नामाचा वापर सामान्य नामाप्रमाणे करायचा असल्यास त्याचे अनेकवचन केले जाते.
Poetry, Traffic, Luggage, Furniture, Equipment, Drapery etc. शब्दांचे अनेकवचन करु नये व क्रियापद एकवचनी ठेवावे.
1) This luggage is very heavy.
2) Gulzar's poetry is very popular in India.
टिप्पणी पोस्ट करा