Migrating from Universal Analytics सर्वनाम| Pronoun| Sarvanam in marathi | pronoun in marathi

                

सर्वनाम| Pronoun|Pronoun Sentences| pronoun in marathi| pronoun in marathi


व्याख्या - नामाऐवजी किंवा नामाची पुनरावृत्ति टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम (Pronoun) असे म्हणतात.

उदा . He, She, It, I, We, You, They etc.


        Pronoun(सर्वनाम) चे नऊ प्रकार आहेत.

 1. Personal Pronoun (पुरुषवाचक सर्वनाम)

 2. Reflexive Pronoun (कर्मवाचक सर्वनाम)

 3. Demonstrative Pronoun (संकेतवाचक सर्वनाम)

 4. Relative Pronoun (संबंधवाचक सर्वनाम) 

 5. Interrogative Pronoun (प्रश्नवाचक सर्वनाम)

 6. Indefinite Pronoun (अनिश्चयवाचक सर्वनाम)

 7. Distributive Pronoun (विभागबोधक सर्वनाम)

 8. Exclamatory Pronoun (उद्गारवाचक सर्वनाम)

 9. Emphatic Pronoun (परिणामकारी सर्वनाम)


Also read - Verb.

1. Personal Pronoun (पुरुषवाचक सर्वनाम) -

 बोलणारे, ऐकणारे किंवा ज्याच्या विषयी बोलणे चालू आहे त्या तीन्ही लोकांचा उल्लेख करणाऱ्यास Personal Pronoun (पुरुषवाचक सर्वनाम) असे म्हणतात.


I, We, You, He, She, It, They etc.

उदा. 1)Ashoka was a king, he was brave.

2) He has a dog, he loves it very much.


पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात.

First Person - स्वतः चा उल्लेख होतो ते प्रथम पुरुषी- I,We

Second Person- ज्यांच्याशी बोलतो ते द्वितीय पुरुषी- You.

Third Person - ज्यांच्या विषयी बोलतो ते तृतीय पुरुषी-

He, She, It, They.


 2. Reflexive Pronoun (कर्मवाचक सर्वनाम) -

कर्त्याने केलेली कृती त्याच्या स्वत: वरच घडत असेल तर ती कृती Reflexive Pronoun (कर्मवाचक सर्वनाम) ने दर्शविली जाते.

himself (स्वतः, स्वतःला), Themself (त्यांना स्वतःला) आणि yourself (तू स्वतः) हे Reflexive Pronoun (कर्मवाचक सर्वनाम) आहेत.


उदा. a) He hide himself. 

       b) You hurt Yourself.


3. Demonstrative Pronoun (संकेतवाचक सर्वनाम) -

ज्या सर्वनामामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्ति किंवा वस्तुचा बोध होतो त्याला Demonstrative Pronoun (संकेतवाचक सर्वनाम) असे म्हणतात

Demonstrative Pronoun (संकेतवाचक सर्वनाम) नामाकडे दिशानिर्देश करतो.

This(एकवचन), These (अनेकवचन)- जवळची वस्तु दाखविण्यासाठी.

This is a boy.

These are boys.

That(एकवचन), Those(अनेकवचन) - लांबची वस्तु दाखविण्यासाठी.

That is a car.

Those are cars.

 

वरील उदाहरणात This, These आणि That, Those द्वारे Boy आणि Car या नामाकडे दिशानिर्देश केला आहे म्हणून हे Demonstrative Pronoun (संकेतवाचक सर्वनाम) आहे.


 4.  Relative Pronoun (संबंधवाचक सर्वनाम) -

Whom, Which, That आणि What 

उदा . Who, Whom, Which, Whose, What, That etc. 

चा वापर एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात नामाला प्रश्न विचारण्यासाठी करतात तेव्हा ते Relative Pronoun (संबंधवाचक सर्वनाम) असतात.


Who - जो, जी, जे 

फक्त व्यक्तीसाठी who चा वापर करतात. Who हे उभयलिंगी (स्त्रीलिंगी व पुल्लिंगी) सर्वनाम असून त्याचे एकवचनी व अनेकवचनी रूप who च आहे, मात्र विभक्तीनुसार प्रथमा who/ द्वितीया whom/ षष्ठी whose असे प्रकार पडतात.

1) The man, who is honest, is trusted.

2) I don't know, who brought these books.


Whom - ज्याला, जिला, ज्यानां

द्वितीया विभक्ती असल्याने फक्त व्यक्तिरूपी कर्मासाठीच वापरतात. 

1) The man, who I met yesterday, is a great person.

2) Akash is the only reliable person whom we can ask this.


Whose - ज्याचा , जीचा

सजीवांसाठी जरी whose वापरले जात असले तरी काही प्रसंगी निर्जीव घटकांसाठी देखील whose वापरले जाते.

1) This is a boy, whose name is Sagar.

2) A square, whose four sides are equal, is called an equilateral square.


That - जो, जी, जे, ज्याने

That चा उपयोग सजीव किंवा निर्जीव घटकां साठी केला जातो.

1) All that glitters is not gold.


Which आणि what - हे दोन्ही नपुंसकलिंगी सर्वनाम आहे याचा वापर वाक्ये जोडण्यासाठी केला जातो त्याचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच आहे.

1) This is the only book which I haven't read.


5. Interrogative Pronoun (प्रश्नवाचक सर्वनाम) -

ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला Interrogative Pronoun (प्रश्नवाचक सर्वनाम) असे म्हणतात .

उदा. What, Which, Who, Whose, When, Where, How etc.


What- निर्जीव वस्तुसाठी किंवा व्यक्तीसाठी वापरतात.

1) What is your father?

2) What is your goal?

Which - प्राणी किंवा वस्तु साठी वापरतात. त्यातून समुहातील एक किंवा अनेक घटकाची निवड करणे सूचित होते.

1) Which flower do you like?

2) Which is a faithful animal?

How - (कसे) - पद्धत विचारण्यासाठी वापरतात.

1)How does he come?

When - वेळ विचारण्यासाठी वापरतात.

1) When did she go?


6. Indefinite Pronoun (अनिश्चयवाचक सर्वनाम) - 

ज्या सर्वनामामुळे एखाद्या निश्चित व्यक्ति किंवा पदार्थाचे ज्ञान होत नाही त्यास Indefinite Pronoun (अनिश्चयवाचक सर्वनाम) असे म्हणतात.

All, some, few, everyone, everybody, nobody, anyone, someone etc.

उदा . 1) All were present.

2) Someone has stolen my pocket.


7. Distributive Pronoun (विभागबोधक सर्वनाम)-

ज्या सर्वनामामुळे दोन किंवा अधिक व्यक्तिन्चा प्रत्येकाचा वेगवेगळा बोध होतो त्यास Distributive Pronoun (विभागबोधक सर्वनाम) असे म्हणतात.

Each  -  प्रत्येक

Either  - दोन्हीपैकी एक

Neither - दोन्हीपैकी एकही नाही

उदा. 1) Each of the students received a prize.

यामधे Each हे Distributive Pronoun (विभागबोधक सर्वनाम) आहे.


 Also read - Alphabet.


8. Exclamatory Pronoun (उद्गारवाचक सर्वनाम) - 

उद्गार दर्शवणाऱ्या सर्वनामांना Exclamatory Pronoun (उद्गारवाचक सर्वनाम) असे म्हणतात.

1) What! Are you hungry?


9. Emphatic Pronoun (परिणामकारक सर्वनाम) - 

ज्यावेळी कर्त्याने केलेली कृती जोर देऊन सांगितली जाते तेव्हा तेथे परिणामकारक सर्वनाम होते.

आत्मवाचक व परिणामकारक सर्वनाम एकच आहेत.

1) He himself said no.

2) The town itself is not very large.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने