Migrating from Universal Analytics वर्णमाला | Alphabet | Alphabets meaning in marathi | Vowels| Consonant.
वर्णमाला | Alphabet | Alphabets in marathi | Vowels| Consonant.
Programmar4U येथे English grammar in marathi मध्ये शिकू शकाल जेणेकरून आपण वैयक्तिक आणि औपचारिक या दोन्हीमध्ये आपले बोलण्याचे व लिहिण्याचे कौशल्य सुधारू शकता.

आपण मूलभूत गोष्टींसह प्रारंभ करीत असलात किंवा जटिल विषय समजून घेऊ इच्छित असाल तर आपण योग्य सरावाने आपण इंग्रजी वर प्रभुत्व मिळवू शकता.


इंग्रजी भाषेत एकूण 26 अक्षरे असतात. प्रत्येक अक्षर दोन प्रकारे तयार होते ज्याला आपण छोटी लिपी (Small Letter) आणी मोठी लिपी (Capital Letter) म्हणतो.


Must read: NounPronounVerb


                 Alphabets in order

   मोठी लिपी (Capital Letter)

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z.


  छोटी लिपी (Small Letter)

a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z.


Capital Letters चा उपयोग खालील बाबतीत केला जातो.

 1. कोणतेही स्थान, देश, लोकांची नावे, पर्वत, समुद्र, नदया इ. च्या नावाची आद्याक्षरे.

 2. महीना, दिवस, इ. च्या नावाची आद्याक्षरे.

 3. कोणत्याही उदाहरणाच्या वाक्याचे आद्याक्षरे.

 4. कवितेच्या प्रत्येक ओळीचे आद्याक्षरे.

 5. शब्दांचे संक्षिप्त रूपांचे अक्षर.

 6. विशेष वस्तु, निर्देशित करणारे शब्दांचे आद्याक्षरे.


Capital letters आणि Small letters या दोन्ही प्रकारच्या अक्षरांचे उच्चार सारखेच आहेत है लक्षपूर्वक समजले पाहिजे. 

इंग्रजी भाषेत 'त' होत नाही मराठीतील 'त' इंग्रजी 'T' द्वारे लिहितात.

मराठी भाषेत क, ख, ग... इ. अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी लावून अक्षरे बनतात, परंतु इंग्रजीमधे अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी लावत नाहीत. त्याऐवजी A, E, I, O, U यापैकी योग्य स्वर अक्षर बनवतात.


अक्षरांचे उच्चार व त्यांचे लिखाण

स्वरांचा उच्चार दुसऱ्या अक्षरांविना होत असतो. या मूळ स्वरांच्या उच्चारात जेवढा वेळ लागतो त्यांना मात्रा म्हणतात

 याप्रकारे आपण ए, इ, आय, ओ, यू च्या गुणात्मक ध्वनीद्वारे शब्दाची रचना करु शकतो, स्वर अक्षरांशिवाय कोणतेही शब्द तयार होत नाही.


वरील 26 अक्षरांमध्ये खालील पाच अक्षर स्वर (Vowels) आहेत.

A   a  ए

E   e   इ 

I   i  आय

O   o  ओ

U   u  यू


स्वर (Vowels) 

अ   आ   इ   ई    उ   ऊ  ए    ऐ   ओ औ   अं   अ:

a   aa   i   ee   u  oo ae  ai    o  au  an  ah


स्वरांना सोडून बाकीचे अक्षर व्यंजन (Consonant) आहेत.


मराठी वर्णमालेनुसार इंग्रजी अक्षरमाला


    व्यंजन (Consonant)

क    ख     ग    घ     ङ    च     छ  ज      झ     

Ka,c  Kh   Ga  gha  N  Cha chha Ja  Jha, Za,


ञ    ट    ठ    ड      ढ    ण   त    थ    द      ध      न  

N   Ta Tha Da  Dha  Na Ta Tha Da   Dha  Na


  प         फ    ब    भ      म    य      र     ल      व        

Pa pha,   Fa   Ba  Bha  Ma  Ya  Ra  La    Va 


   श        ष       स     ह     ळ      क्ष        ज्ञ

 Sha    Sha    Sa   Ha   La  ksha  Dnya


नियम -

  • कोणत्याही शब्दात 'C' नंतर i, e, y येत असेल तर 'C' चा उच्चार 'स' असा करावा. उदा. Cell (सेल), Circle (सर्कल), Cycle (सायकल) इ.
  • कोणत्याही शब्दात 'C' नंतर i, e, y सोडून दूसरा कोणतेही अक्षर येत असेल तर 'C' चा उच्चार 'क' असा करावा.उदा, Cat (कॅट), Cow (काऊ), Club (क्लब), Cylinder (सिलिंडर) इ.
  • अनुस्वाराचा उच्चार 'म्' असा होत असल्यास त्यासाठी 'm' वापरावे.उदा. Sampat (संपत), Sambhaji (संभाजी) इ.
  • अनुस्वाराचा उच्चार 'न्' असा होत असल्यास त्यासाठी 'n' वापरावे.

    उदा. Shankar (शंकर), Santosh(संतोष) इ.

  • शब्दाच्या शेवटी जोडाक्षर आल्यास त्या शब्दाच्या शेवटी 'a' लावावे. उदा. Rashtra (राष्ट्र) ,  Rajendra (राजेन्द्र).
  • शब्दाच्या शेवटी 'अ' या स्वराचा उच्चार होत नसल्यास शेवटी 'a' लावू नये. उदा. Ahmedabad (अहमदाबाद). Aurangabad (औरंगाबाद).

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने