Migrating from Universal Analytics भूतकाळ | Past Tense meaning in marathi | Past tense sentences in marathi
भूतकाळ | Past Tense and Past tense sentences in marathi
Past Tense meaning- एखादी क्रिया झाली किंवा घडून गेली आहे हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात.

               Types of Past Tense in marathi

भूतकाळाचे चार उपप्रकार आहेत .


 1.  Simple Past Tense.(साधा भूतकाळ)

 2.  Past Continuous tense.(चालू भूतकाळ)

 3.  Past Perfect Tense.(पूर्ण भूतकाळ )

 4.  Past Perfect Continuous Tense.( पूर्ण चालू भूतकाळ)

 

 1. Simple Past Tense (साधा भूतकाळ)

 वाक्यरचना

S+ V2+ O (कर्ता + क्रियापदाचे दूसरे(भूतकाळी) रूप + कर्म )

नियम

  • कर्त्या नंतर क्रियापदाचे दूसरे रूप लावतात.
  • प्रश्नार्थी किंवा नकारार्थी वाक्य बनवताना did लावतात.

उपयोग

A) भूतकाळातील एखादी विशिष्ट वेळ सांगण्यासाठी -

1)  I received his letter a week ago.

      आठवड्यापूर्वी मला त्याचे पत्र मिळाले.

2) We purchased a bike last month.

     आम्ही गेल्या महिन्यात दुचाकी खरेदी केली.

3) He met me yesterday.

      काल तो मला भेटला.

B. वेळ विचारण्यासाठी

1) When did you pass this exam?

      तुम्ही ही परीक्षा कधी पास केली?

2) When did he purchase this car?

      त्याने ही कार कधी खरेदी केली?

C) एखादी विशिष्ट वेळी घडलेली घटना सांगण्यासाठी परंतु वेळ निश्चित नसते -

1) The flight was four hour behind this schedule.

2) I worked in this company for ten years.

D) भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी -

1) I played chess when I was in college.

2) She practised the guitar every day.

    मी या कंपनीत दहा वर्षे काम केले.


 2.  Past Continuous Tense (चालू भूतकाळ)

 वाक्यरचना - 

कर्ता+ was/ were + क्रियापदाला ing..

नियम - 

  • एकवचनी शब्दासोबत was वापरतात.
  • अनेकवचनी शब्द तसेच you सोबतही were वापरतात.

उपयोग - 

A) एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे सांगण्यासाठी

1) We were watching T.V all evening.

    आम्ही संध्याकाळी टीव्ही पाहत होतो.

2) When I saw him , he was playing cricket.

    जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा तो क्रिकेट खेळत होता.

B) क्रियेमध्ये होणारी वाढ किंवा प्रगति दर्शविण्यासाठी -

1) It was getting darker and darker.

    हे दिवसेंदिवस गडद होत चालले होते.

2) The heat was increasing.

    उष्णता वाढत होती.

C) एखादया गोष्टीचे वर्णन करण्यासाठी

1) Buffalo was lying in the mud.

     म्हैस चिखलात पडली होती.

2) A river was flowing.

    नदी वाहात होती.

3) Waves were crashing on the shore.

    किनारयावर लाटा कोसळत होत्या.


3. Past Perfect Tense (पूर्ण भूतकाळ )

वाक्यरचना - 

कर्ता + has + क्रियापदाचे तीसरे रूप +....

नियम - 

  • कर्त्यानंतर had हे सहाय्यक क्रियापद लावतात.
  • had नंतर क्रियापदाचे तीसरे रूप लावतात.

उपयोग - 

A) भूतकाळात सुरु झालेली क्रिया भूतकाळातच समाप्त झाली आहे हे दर्शविण्यासाठी-

1)  I had written a letter.

    मी एक पत्र लिहिले होते.

2) He had completed homework.

    त्याने गृहपाठ पूर्ण केला होता.

B) प्रत्यक्ष कथनामध्ये (In indirect speech)- Indirect speech मधे पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भविष्य काळात होतो व साधा भूतकाळ हा पूर्ण भूतकाळात बदलतो.

1) She said, "I saw him".

    ती म्हणाली, "मी त्याला पाहिले".

indirect speech- She said that she had seen him.

      तिने सांगितले की तिने त्याला पाहिले होते.

2) He said, "I have been to Delhi".

indirect speech - He said that he had been to delhi.


4.  Past Perfect Continuous Tense( पूर्ण चालू भूतकाळ)

 वाक्यरचना - 

कर्ता + had been +क्रियापदाला ing +...

नियम - 

  • कर्त्या नंतर had been लावतात.
  • क्रियापदास -ing प्रत्यय लावतात.

उपयोग - 

A) एखादी क्रिया भूतकाळात आधी सुरु होऊन एखाद्या ठराविक वेळेवरही सुरुच होती असे दर्शविण्यासाठी - 

1) At that time, He had been writing a novel for two months.

    त्यावेळी ते दोन महिन्यांपासून कादंबरी लिहित होते.

2) He had been living there for 5 years.

    तो तेथे पाच वर्षे राहिला होता

3) She had been working for her family at that time.

   ( त्यावेळी ती आपल्या कुटुंबासाठी काम करत होती.)

B) पूर्ण भूतकाळातील एखादी वारंवार घडणारी क्रिया सांगण्यासाठी -

1) He had been trying to see her.

    तो तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता.

2) They had been repeating every action in their film.

   ते त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक क्रियेची पुनरावृत्ती करत होते.

3) The snow had been falling continuously all day.

    दिवसभर बर्फ सतत पडत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने