Migrating from Universal Analytics Noun | Noun in marathi | नाम | naam in marathi

Noun | Noun in marathi | नाम | Noun Sentences


व्यक्ती, वस्तु, स्थान, पदार्थ यांच्या नावाला नाम (Noun) असे म्हणतात.

Functions Of Noun (नामाचे कार्य)

नामाचे कार्य त्याच्या वाक्यातील स्थानावरुन बदलत असते.

How to identify a Noun from a sentence?
(वाक्यातील नाम कसे शोधावे?)
  • वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते.
1) Rohan broke a cup.
  • शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द नाम असतो.
1) He went to Mumbai.
  • षष्ठी नंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो.
1) He is my friend.
  • a/ an/ the या उपपदानंतर येणारा शब्द नाम असतो.
1) There is a possibility of rain today.
  • s/ of च्या मागे पुढे येणारे नेहमी नाम असतात.
1) This is Sagar's bag.
2) The cap of the pen.

Noun (नाम) कसे कार्य करतात ते पाहुया.
A) Subject of the Verb - क्रियापदाचा कर्ता
1) Minal sings a song.
वरील वाक्यात कर्ता हे नाम (Minal) असल्याने याला क्रियापदाचा कर्ता असे म्हणतात.

B) Complement of the Verb - क्रियापदाचे पूरक

1) He is a teacher.
वरील वाक्यात क्रियापदानंतर आलेले नाम कर्त्या बद्दल अधिक माहित सांगत असल्याने त्याला क्रियापदाके पूरक असे म्हणतात.

C) Object of the verb - क्रियापदाचे कर्म

1) I saw Ramesh.
वरील वाक्यात क्रियापदानंतर जे नाम (Ramesh) आले आहे त्यावर कर्त्याची क्रिया घडत असल्याने त्याला क्रियापदाचे कर्म असे म्हणतात.

D) Object of a Preposition - शब्दयोगी अव्ययाचे कर्म

1) I spoke to Rakesh.
शब्दयोगी अव्ययानंतर आलेल्या नामाला शब्दयोगी अव्ययाचे कर्म असे म्हणतात.

हे देखिल वाचा - PRONOUN , VERB .

नामाचे खालील 5 प्रकार पडतात.

1) Proper Noun (विशेष नाम)
2) Common Noun(सामान्य नाम)
3) Collective Noun(समूहवाचक नाम)
4) Material Noun(पदार्थवाचक नाम)
5) Abstract Noun (भाववाचक नाम)

1. Proper Noun (विशेष नाम) -

विशिष्ट घटकापूरते मर्यादित असणाऱ्या नामाला  Proper Noun (विशेष नाम) असे म्हणतात.
उदा. Mahesh, Anil, Mumbai, India, America, Kanpur etc.
एखाद्या विशेषणामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी केल्यास त्यापूर्वी a/ an/ the हे उपपद वापरतात
उदा.
1) Kalidas is a Shakespeare. (एक नाटककार)
2) Kalidas is a Shakespeare of India.(निश्चित स्थळाच्या संदर्भात)
3) There are many Kumbhakarnas in class.

 2. Common Noun (सामान्य नाम) - 

ज्या शब्दामुळे कोणत्याही जातीच्या वस्तु किंवा व्यक्तिचा बोध होतो त्याला Common Noun (सामान्य नाम) असे म्हणतात.

उदा. Book, Pen, Man, Girl, School, Cat, City, Star, Tree, House etc.

3.Collective Noun (समूहवाचक नाम) -

ज्या शब्दामुळे कोणत्याही वस्तु किंवा समुहाचा बोध होतो त्याला Collective Noun (समूहवाचक नाम) असे म्हणतात.

 उदा. Party, Family, Team, Committee, Army, Bunch, Bundle, Crowd, Team, Parliament,  etc.

4.Material Noun (पदार्थवाचक नाम) - 

लीटर, मीटर किंवा किलोग्राम मधे मोजल्या जाणाऱ्या घटकांच्या नावांना Material Noun (पदार्थवाचक नाम) असे म्हणतात.

उदा. Wood, Tea, Gas, Soil, Steel, Salt, Sugar, Water, Iron, Gold, Rice etc.

पदार्थवाचक नामांचा वापर फक्त एकवचनी होतो, पदार्थवाचक नामापुर्वी a/ an/ the ही रुपे वापरली जात नाहीत, परंतु काही प्रसंगी पदार्थवाचक नामासाठी एकापेक्षा अधिक विशेषणे वापरली जातात तेव्हा असे पदार्थवाचक नाम अनेकवचनी रुपात लिहिले जाते.
उदा. In its steel, clean water reflected the sky blue. जर पदार्थवाचक नामासोबत एखाद्या साधनाचा उपयोग केल्यास अशा साधना पूर्वी a/ an वापरले जाते.
उदा.
1) a milk bag, a glass of water, a petrol tank etc.

पदार्थवाचक नामापुर्वी वापरलेले परिमाण एकापेक्षा अधिक संख्या दर्शवित असेल तरी , ते परिमाण एकवचनी रुपातच लिहिले जाते, कारण अशावेळी ते विशेषण म्हणून वापरले जाते आणि विशेषण हे नेहमी एकवचनी लिहिले जाते.
उदा.
1) Three liters water. (incorrect)
     Three liter water. (correct)
5 kg sugar.  6 meter cloth.


5. Abstract Noun (भाववाचक नाम) -

ज्यांना आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करु शकतो, अशा स्थितिच्या, भावनेच्या, गुणाच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचारपद्धतीच्या नावास Abstract Noun(भाववाचक नाम) असे म्हणतात.
उदा.
Beauty, Kindness, Fondness, Death, Sleep etc. 
भाववाचक नामाचे तीन प्रकार पडतात.
1) Quality - गुणदर्शक (Honesty, Wisdom).
2) State - स्थितिदर्शक (Poverty, Freedom).
3) Action - कृतिदर्शक (Movement, Theft).

नामांची खालील 2 गटात विभागणी केली जाते
1) Countable Noun.
2) Uncountable Noun.
Countable Noun - म्हणजे संख्येत मोजता येणारे नाम.
उदा. Tree, Book, Boy, Dog etc.
Uncountable Noun - म्हणजे संख्येत न मोजता येणारे नाम.
उदा. Water, Sugar, Oil, love etc.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने