Migrating from Universal Analytics Verb | Verb in marathi | क्रियापद | kriyapad in marathi

                         Verb

ज्या शब्दामधुन क्रिया (कृती) व्यक्त होते किंवा जे शब्द स्थिति व्यक्त करतात त्या शब्दांना क्रियापद (Verb)म्हणतात.

उदा. a) Mohan writes a letter.

       b) We eat mangoes.


वरील वाक्यात writes, eat या शब्दांद्वारे कोणत्या ना कोणत्या क्रमाचे कार्य प्रकट होते . प्रथम वाक्यात मोहनच्या पत्र लिहिण्याचे ज्ञान होते तर दुसऱ्या वाक्यात आंबा खाण्याची क्रिया माहित होते.


                  Types of verb

                 Verb चे दोन प्रकार आहेत.

1. Main verb (मुख्य क्रियापद) 

2. Auxiliary verb / Helping Verb(सहाय्यकारी क्रियापद) 


1. Main verb (मुख्य क्रियापद) - वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास म्हणजे आपण ज्या क्रिया करतो ते दर्शविणाऱ्या शब्दास मुख्य क्रियापद म्हणतात.

उदा. 1) He is walking.

2) He is running.


Main verb (मुख्य क्रियापद) चे दोन भाग पडतात.

1. Transitive (सकर्मक)   2. Intransitive(अकर्मक)


 1. Transitive (सकर्मक) - जो Verb Subject शिवाय Object असतो त्याला Transitive Verb (सकर्मक क्रियापद) असे म्हणतात .

उदा. Mohan reads his books.

वरील वाक्यात Mohan हा कर्ता असून reads नंतर books Object झाले आणि Read Transitive Verb झाले.


 2. Intransitive Verb (अकर्मक क्रियापद) - 

जर एखादया वाक्यात केवळ (Verb) क्रिया करणाराच असेल आणि क्रियेचे फळ दुसऱ्याला न मिळता करणाऱ्याला मिळाले तर त्या Verb ला Intransitive Verb (अकर्मक क्रियापद) असे म्हणतात.


उदा. 1) Ram sleeps.

2) He laughs loudly.


वरील वाक्यात sleeps चा कर्ता Ram आहे आणि sleep चा परिणाम सुद्धा Ram वरच पडेल म्हणून 'sleep' Intransitive Verb (अकर्मक क्रियापद) आहे.


2. Auxiliary verb / Helping Verb (सहाय्यकारी क्रियापद) - 

Auxiliary या शब्दाचा अर्थ सहाय्य करणारा असा होतो.

वेगवेगळे अर्थ तयार करणे, वेगवेगळे काळ बनवणे या साठी याचा उपयोग होतो.

Auxiliary verb (सहाय्यकारी क्रियापद) चे दोन प्रकार पडतात.

1. Primary Auxiliary (प्राथमिक सहाय्यकारी)

2. Modal Auxiliary (भाववाचक सहाय्यकारी)


Primary Auxiliary (प्राथमिक सहाय्यकारी) क्रियापदात एकूण 11 रुपे येतात 

To be ची रुपे - am, is, are, was, were.

To have ची रुपे - Have, Has, Had.

To Do ची रुपे - Do, Does, Did.

            

Primary Auxiliary (प्राथमिक सहाय्यकारी) क्रियापदाच्या मुख्य रूपांचे उपयोग पाहुयात.

To be - To be चा अर्थ असणे असा होतो. मुख्य क्रियापदे म्हणून to be ची रुपे वापरली जातात.

उदा.

1) I am a boy.

2) He was a teacher.

To have -  To have चा उपयोग मालकी दर्शविण्यासाठी केला जातो.

1) I have a car.

2) They had a big house.

To do - करणे किंवा केले हे दर्शविण्यासाठी To do चा उपयोग केला जातो.

1) I do my homework.

2) She did her work.


Modal Auxiliary (भाववाचक सहाय्यकारी) क्रियापदात एकूण 13 रुपे येतात.

Modals - shall, will, should, would, can, could, may, might, must.

Semi modals - dare to, ought to, used to, need to.




  • Modal Auxiliary (भाववाचक सहाय्यकारी) क्रियापदांचे उपयोग पाहुयात. 
1. Shall/ Will -
याचा उपयोग भविष्य दर्शविण्यासाठी केला जातो. सामान्यपने I/We नंतर shall वापरतात परंतु खडसावणे, ठामपणे सांगणे , मदत करणे यासाठी I/We नंतर will वापरतात.
1) I shall go to Mumbai tomorrow.

2) I will help you.

3) I will not to do this again.

वचन किंवा खात्री देण्यासाठी -

1) Your son shall be given all possible help.

आज्ञा देण्यासाठी - 

1) He shall obey my orders.

विनंती करण्यासाठी -

1) Will you close the door?


2. Can/ Could चा उपयोग- क्षमता किंवा शक्यता व्यक्त करण्यासाठी तसेच परवानगी देण्यासाठी/ घेण्यासाठी सुद्धा Can चा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे Could चा उपयोग भूतकाळातील योग्यता व्यक्त करण्यासाठी केला जातो.

1) You can go.

2) She could sing a song.

प्रश्न विचारण्यासाठी - 

1) What can I do?

2) Who can do this?

3) Could I use your pen?

Direct चे Indirect Speech करताना can चे could होते.

She said, "I can sing a song".

She said that she could sing a song.

सामान्यपणे परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी can/ may वापरतात परंतु औपचारिक किंवा वरिष्ठ व्यक्तीनां परवानगी मागण्यासाठी May वापरतात.

1) May I come in sir?

2) Can I seat he.


3. Should चा उपयोग - सौम्यपणे सल्ला सांगण्यासाठी व करायला पाहिजे किंवा करायला हवी असा अर्थ व्यक्त करण्यासाठी should चा उपयोग करतात.

1) You should study hard.

2) We should leave now.

काही प्रसंगी should ऐवजी had better वापरले जाते.

1) You should consult a therapist.  

2) You had better consult a therapist.

वाक्यात That नंतर पुढीलप्रमाने should चा उपयोग होतो.

1) It is really amazing that you should say that.

इच्छा व्यक्त करण्यासाठी - 

1) God/ Heaven forbid that this should ever happen.

(परमेश्वर करो अस कधी न घडो.)


4. Would चा उपयोग -

विनंती करताना will चे सौम्य रूप म्हणून would वापरतात.

1) Would you (please) close the door as you go out?

2) Would you please give me your pen?

Direct चे Indirect Speech करताना shall/will ऐवजी would वापरतात.

1) He said I will not help you

2) He said that he would not help him.

काल्पनिक इच्छा किंवा पसंदीसाठी would वापरले जाते.

1) I would love to live in Pune.


5. May चा उपयोग- 

शक्यता व्यक्त करण्यासाठी-

1) He may be at home.

2) It may rain today.

वरिष्ठ लोकांना परवानगी मागण्यासाठी-

1) May I go now?

2) May I come in sir?

उद्देश व्यक्त करण्यासाठी - 

1) He studied hard that he may get good marks.

2) We eat that we may live.

आशीर्वाद किंवा शुभकामनेसाठी may वापरल्यास वाक्य  उद्गारवाचक होते.

1) May god bless you!

2) May God protect you!

3) May God forgive us!

4) May god help you!


6. Might चा उपयोग - 

Might हा may चा भूतकाळ आहे. 

Direct speech चे Indirect speech करताना may चे might होते.

1) He said, "it may rain today."

2) He said that it might rain today.

शक्यता व्यक्त करण्यासाठी देखील might वापरतात.

1) She might come here.

2) He might be thirsty.

May पेक्षा might ने अधिक नम्र विनंती केली जाते.

1) Might I use your telephone?


7. Must चा उपयोग- 

करायलाच पाहिजे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी किंवा बंधन, सक्ती करण्यासाठी must चा उपयोग होतो.

1) We must travel with ticket.

2) You must not smoke in the promises.

दाट शक्यता व्यक्त करण्यासाठी - 

1) He must be hungry.

2) He must be ill. 


8. Dare to चा उपयोग -

Have/ Has/ Had the courage च्या ऐवजी Dare to वापरतात, धाडस असणे हे सांगण्यासाठी.

1) She had the courage to fight with the thieves. 

2) She dare to fight with the thieves


9. Ought to चा उपयोग -

should प्रमाणे याचा उपयोग देखील करायला पाहिजे या अर्थाने याचा खालीलप्रमाणे उपयोग होतो.

नैतिक व सामाजिक बंधनाची सूचना देण्यासाठी.

1) You ought to obey your parents.

2) We ought to obey our elders.

Direct speech चे Indirect speech करताना Ought to चे रूप बदलत नाही.

1) She said, "I ought to study hard."

2) She said that he ought to study hard.


10. Used to  चा उपयोग -

भूतकाळातील सवय किंवा भूतकाळातील नेहमी होणारी क्रिया सांगण्यासाठी used to वापरतात.

1) He used to smoke.

2) He used to live in London then.

Used to वाक्याचे नकारार्थी वाक्य दोन प्रकारे करता येते.

1) He used not to lie.

2) He did not used to lie.


11. Need to चा उपयोग -

एखादी क्रिया करण्याची गरज आहे, करायलाच पाहिजे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी Need to चा उपयोग करतात.

1)You need to work harder.

2) You need to read this book





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने