Migrating from Universal Analytics Conjunction in marathi | Interjection in marathi

          CONJUNCTION (उभयान्वयी अव्यय)


Meaning of Conjunction - दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला Conjunction (उभयान्वयी अव्यय) असे म्हणतात.

उदा. 

a) Sheela and Lata went to the station.

      (शीला आणि लता स्टेशनवर गेले.)

या वाक्यात and हा शब्द Sheela आणि Lata या शब्दांना जोडतो.


b) He is a poor man but he is very honest.

   (तो गरीब माणूस आहे पण तो खूप प्रामाणिक आहे.)

या वाक्यात but हा शब्द He is poor man आणि he is very honest या वाक्यांना जोडतो.


उभयान्वयी अव्ययाचे खालील प्रकारे दोन प्रकार पडतात.

1) Coordinating conjunction - सहाय्यक उभयान्वयी अव्यय.

या अव्ययाचा वापर शब्द, शब्दसमूह आणि नामे जोडण्यासाठी केला जातो.

Eg. and, but, both...and, as well as, neither...Nor, either...or, not only...but also, yet, however , yet, still, so, for, hence, therefore etc.


2) Subordinating conjunction - पूरक उभयान्वयी अव्यय.

मिश्र वाक्य करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दोन वाक्ये अर्थपूर्ण पद्धतीने जोडणाऱ्या शब्दांना Subordinating conjunction म्हणतात.

उदा. as, as soon as, when, no sooner than, hardly...when, when, before, after,till, until, since, as long as , because, that, as, though, although, if, unless, still, where, whom, which, whose etc.



                INTERJECTION (उद्गारवाचक अव्यय)


Meaning of Interjection - ज्या शब्दामध्ये आनंद, सुख, दुःख, आश्चर्य इ. प्रकट केले जातात त्यांना Interjection (उद्गारवाचक अव्यय) असे म्हणतात.

Conjunction in marathi | Interjection in marathi

उदा. 1) Oh ! What a beautiful flower you have.

       2) Ah ! Gandhiji is no more.

       3) Good - bye farewell !

       4) Huraah ! We won the match.

       5) Sorry ! Please excuse me.

       6) Bravo ! You play well.

       7) How beautiful it is !


वरील वाक्यात Oh! ने आनंद, Ah! ने दुःख आणि Good - bye ने निरोप घेण्याचा विशेष भाव प्रकट होतो त्यामुळे Oh, Ah आणि Good - bye हे Interjection (उद्गारवाचक अव्यय) आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने