Migrating from Universal Analytics वर्तमानकाळ | Present tense in marathi | Present tense sentences in marathi | vartman kal in marathi

           

Present tense and Present tense sentences in marathi | वर्तमानकाळ

ज्याप्रमाणे मराठीत तीन काळ असतात त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा प्रामुख्याने तीन काळ असतात.

 1. Present Tense (वर्तमान काळ)

 2. Past Tense (भूतकाळ)

 3. Future Tense  (भविष्यकाळ)


त्यातील Present Tense म्हणजे वर्तमान काळ पाहुया.

 

 1. Present Tense (वर्तमान काळ)

जेव्हा वाक्यातील क्रिया ही चालू काळाचा म्हणजे वर्तमान काळाचा निर्देश करते तेव्हा तो वर्तमान काळ असतो.

उदा. a) He writes.          b) She sings.

       c) They play.           d) We walk.


     वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत ते पाहुया


 1. Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

वाक्यरचना - Subject + Verb + Object.. ( कर्ता+ क्रियापद + कर्म)

नियम - 

A.साध्या वर्तमानकाळात कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरतात.

B. कर्ता एकवचनी असल्यास क्रियापदाला 'S' लावतात.

C. कर्ता अनेकवचनी असल्यास क्रियापदाला 'S' लावत               नाहीत.

D. I आणि You हे कर्ते एकवचनी असले तरी क्रियापदाला 'S' लावत नाहीत.

E. वाक्य प्रश्नार्थक किंवा नकारार्थी करताना 'do' किया 'does' या सहाय्यक क्रियापदांचा उपयोग करतात.

उदा. 

  1. I write a letter.
  2. He sings a song.
  3. We swim in the river.
  4. They play cricket.
  5. Does she write an essay ?

उपयोग - 

A) सवयीच्या गोष्टी सांगण्यासाठी -

  1. He get up everyday at 6 o'clock.
  2. She drinks milk every morning.
  3. Father works in the field everyday.

B) सर्वसामान्य सत्य सांगण्यासाठी-

  1. Sugar is sweet.
  2. Two plus three is equal to five.
  3. The sun rises in the east.

C) भविष्य काळातील योजना किंवा बेत सांगण्यासाठी-

  1. We go to Mumbai next week.
  2. They leave for Delhi this evening.
  3. Uncle arrives here tomorrow.


2. Present Continuous Tense (चालू वर्तमानकाळ)

वाक्यरचना - कर्ता+ am/ is / are + क्रियापदाला ing...

नियम - 

A.कर्त्यानंतर to be' चे सहाय्यक क्रियापद (am / is / are) चा उपयोग करतात त्यानंतर मुख्य क्रियापदास ' ing' प्रत्यय लावतात.

B. I सोबत am वापरतात.

C. I सोडून दुसऱ्या कुठल्याही एकवचनी कर्त्या सोबत is वापरतात.

D. अनेकवचनी शब्दासोबत तसेच You सोबत Are वापरतात.


उपयोग - 

A) आपण ज्या वेळी बोलत असतो त्याचवेळी ती क्रिया चालू असते हे दर्शविण्यासाठी -

  1. I am wearing a sweater as it is cold now.
  2. We are learning English grammar now.
  3. It is raining now.

B) एखादी क्रिया आपण बोलतो त्याक्षणी चालू असते असे नाही तर यापुर्वीहि ती क्रिया चालूच होती हे दर्शविण्यासाठी-

  1. I am working in computer institute this days.
  2. We are preparing for an examination these days.
  3. He is reading Shakespeare these days.

C) नजिकच्या काळात भविष्यकाळातील निश्चितपणे आखलेल्या योजना किंवा कार्यक्रम सांगण्यासाठी - 

  1. I am going to the cinema tonight.
  2. He is going to London a day after tomorrow.
  3. She is going to meet her friend tomorrow.


3. Present Perfect Tense (पूर्ण वर्तमानकाळ) 

वाक्यरचना - कर्ता + have/ has + (क्रियापदाचे तीसरे रूप) ..

नियम - 

A. एकवचनी शब्दासोबत has वापरतात.

B. परंतु I आणि You सोबत have वापरतात.

C.अनेकवचनी शब्दासोबत have वापरतात.

D. मुख्य क्रियापदाचे तीसरे रूप वापरावे. 

उपयोग- 

A) एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शविण्यासाठी-

  1. I have just finished my writing.
  2. We have just arrived.
  3. He has just finished his work.

B) भूतककाळात सुरु केलेली क्रिया अजूनही चालूच आहे हे 

दर्शविण्यासाठीसुद्धा या काळाचा उपयोग होतो.

  1. He has lived here for five years.

  1. I have worked in this company for ten months.


 4 Present Perfect Continuous Tense (पूर्ण चालू वर्तमानकाळ)


वाक्यरचना - कर्ता+ have/has + been + क्रियापदाला ing...

नियम -

A. कर्त्यानंतर have been किंवा has been लावावे व त्यानंतर

B. मुख्य क्रियापदास ..ing प्रत्यय लावावा.


उपयोग- 

A) एखादी क्रिया यापूर्वी चालू होती परंतु ती आता चालू नसेल तर ती क्रिया सांगण्यासाठी - 

  1. The boys have been playing football.
  2. I have been watering the garden.

B) भूतकाळातील क्रिया अद्यापहि चालू आहे हे दर्शविण्यासाठी-

  1. I have been working for ten years.
  2. He has been painting pictures.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने