Meaning of Adverb - ज्या शब्दाद्वारे क्रियेचे स्थळ, वेळ, रीत, उद्देश, कारण दाखवले जाते त्या शब्दांना Adverb (क्रियाविशेषण) असे म्हणतात.
1) Adverb Of Time - कालदर्शक क्रियाविशेषण.
2) Adverb of Place - स्थलदर्शक क्रियाविशेषण.
यात क्रियेचे स्थळ दर्शविणाऱ्या शब्दांचा सामावेश होतो.
Eg. Here, there, up, down, in, out, above, below, inside, under, outside, near, everywhere, backward etc.
क्रियापदाला where ने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे वरीलपैकी क्रियाविशेषण असते.
3) Adverb of Frequency - वारंवारदर्शक क्रियाविशेषण.
यात क्रियेची आवृत्ति दर्शविणाऱ्या शब्दांचा सामावेश होतो.
Eg. Once, twice, thrice, always, never, sometimes, often, seldom, firstly, secondly, frequently etc.
4) Adverb of manner - रीतिदर्शक / पद्धतदर्शक क्रियाविशेषण.
यात क्रिया कशाप्रकारे घडते हे सांगणाऱ्या शब्दांचा सामावेश होतो.
Eg. fast, slowely, honestly, thus, so, well, badly, certainly, beautifully, happily, angrily, clearly, surely, kindly etc.
क्रियापदाला how ने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे वरीलपैकी क्रियाविशेषण असते.
5) Adverb of Degree - परिमाण दर्शक विशेषणे.
क्रियेचे प्रमाण दाखविण्यासाठी याचा उपयोग होतो.
एखादी नामाची दुसऱ्या नामाशी तुलना करून ते सारखेच आहे की सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी या Adverb चा वापर करतात.
Eg. Much, quite, almost, very, too, little, rather, half, partly etc.
क्रियापदाला how much ने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे वरीलपैकी क्रियाविशेषण असते.
6) Adverb of Negation - नकारदर्शक क्रियाविशेषण.
नकार व्यक्त करण्यासाठी ही क्रियाविशेषणे वापरली जातात.
Eg. No, not, never, nothing, none, not at all etc.
7) Adverb of Reason - कारणदर्शक क्रियाविशेषणे.
क्रियेचे कारण सांगण्यासाठी ही क्रियाविशेषणे वापरली जातात.
Eg. Because, as, since etc.
क्रियापदाला why ने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे वरीलपैकी क्रियाविशेषण असते.
8) Interrogative Adverb - प्रश्नवाचक क्रियाविशेषणे.
प्रश्न विचारण्यासाठी ही क्रियाविशेषणे वापरली जातात.
Eg. When, why, where etc.
टिप्पणी पोस्ट करा