Articles (उपपदे)
इंग्रजी नामापुढे विशेषणा सारखे निरनिराळे जे विशिष्ट शब्द वापरले जातात त्यांना Articles उपपदे म्हणतात . इंग्रजी भाषेत उपपदे जास्त प्रमाणात वापरली जातात.
उपपदाचे दोन प्रकार आहेत.
1) Indefinite (A, An) 2) Definite (The)
यातील Indefinite Article पाहुया.
Indefinite Article ला मराठीमध्ये अनिश्चितवाचक उपपदे म्हणतात. त्यांचे उपयोग खालील प्रकारे केले जातात.
Use of A, An
1) एकवचनी सामान्य नामापुर्वी A या उपपदाचा उपयोग करतात.
Eg. A boy, A dog, A cat etc.
2) इंग्रजी भाषेतील 26 मुळाक्षरांपैकी (Alphabets) A, E, I, O, U हे पाच स्वर (Vowels) आहेत आणि बाकीचे व्यंजने (Consonants) आहेत.
ज्या नामाची सुरुवात स्वराने होते. त्या नामापुर्वी An हे उपपद वापरतात.
Eg. An apple, An Umbrella, An Elephant, An Orange etc.
3) A किंवा An हे एकवचनी सामान्य नामापुर्वी वापरतात. अनेकवचनी नामापुर्वी A किंवा An वापरले जात नाही.
Eg. A boy, An apple etc.
4) काही शब्दांची सुरुवात व्यंजनाने होते परंतु त्याचा उच्चार स्वरा सारखा होत असेल तर त्या शब्दापूर्वी An हे उपपद वापरतात.
Eg. An hour, An honest boy etc.
5) काही शब्दांची सुरुवात स्वराने होते परंतु त्याचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर त्या शब्दापूर्वी An हे उपपद वापरतात.
Eg. A University, A Union, A European etc.
6) धंदा , व्यवसाय किंवा एका एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामापुर्वी A किंवा An वापरतात.
Eg. He is a driver.
She is a lawyer.
7) संख्या दर्शविणाऱ्या नामापुर्वी A किंवा An चा उपयोग करतात.
Eg. A hundred, A foot, A dozen, An inch etc.
Use of The
1) नदया, पर्वतरांगा, वर्तमान पत्रे, प्रसिद्ध पुस्तके, दिशा या जगातील एकमेव गोष्टिंच्या नावापुर्वी the वापरतात.
Eg. The Himalayas, The Alps, The Ganga, The times of India, The Ramayana, The Bible, The east, The earth, The sun etc.
2) धर्माच्या नावापुर्वी the वापरतात.
Eg. The Hindu, The Muslim etc.
3) विशेषनामा पूर्वी the वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामासारखा होतो.
Eg. Delhi is the London of India.
Valmiki is the Shakespeare of India.
4) क्रमवाचक विशेषणापुर्वी the वापरतात.
Eg. The first, The second etc.
5) हवामान दर्शविणाऱ्या शब्दांपूर्वी the वापरतात.
Eg. The wind, the air, the rain etc.
6) Market, school, theatre, church, hospital, museum, station इ. शब्द जेव्हा विशिष्ट हेतु सूचित करतात तेव्हा त्यापूर्वी the वापरतात.
Eg. I go to the market.
I am at the station.
7) वाद्यांच्या नावापुर्वी the वापरतात.
Eg. The flute, The violin, The guitar etc.
8) खेळाच्या नामापुर्वी कोणतेही उपपद वापरु नये.
Eg. Cricket, Tennis, Hockey, Football etc.
We play cricket.
9) षष्टी विभक्ती नंतर कोणतेही उपपद वापरु नये.
Eg. This is my a bag. (incorrect)
This is my bag. (correct)
10) president, chief minister, prime minister नामापुर्वी the वापारावे परंतु या नामा नंतर पुन्हा व्यक्तीचे नाव आल्यास the वापरु नये.
Eg. Narendra Modi is the prime minister of India.
Chief minister Mr. Uddhav Thakre is a good person.
11) Comparative degree मध्ये of the two च्या वाक्यात विशेषणाच्या दुसऱ्या रूपापुर्वी the वापरावे.
Eg. He is the taller of the two.
He is the cleverer of the two.
12) घरांच्या दरवाजे, खिडक्या इ. नावापुर्वी the लावतात.
Eg. Open the door.
Open the window.
13) एखादे एकवचनी नाम संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी the वापरावे.
Eg. The dog is a useful animal.
14) शारीरिक अवयवांपूर्वी the वापरतात.
Eg. A stone struck me on the head.
टिप्पणी पोस्ट करा