इंग्रजीमधे खालील प्रमाणे लिंगाचे चार प्रकार पडतात.
1) Masculine (पुल्लिंग)
उदा. boy, man, brother, uncle, lion etc.
2) Feminine (स्रीलिंग)
उदा. girl, women, sister, aunt, queen, lioness etc.
3) Common (सामान्य/ उभय लिंगी)
उदा. Teacher , Student, pupil, thief, servant, enemy etc.
4) Neuture (नपुंसक लिंग)
उदा. table, book, tree, crowd, family etc.
A) बऱ्याचदा निर्जीव घटक व भाववाचक नामांना त्यांच्या भूमिकेप्रमाने पुल्लिंग किंवा स्रीलिंग सर्वनामे वापरली जातात. ज्यामधुन ताकद, शौर्य, हिंसा दर्शविणाऱ्या नामासाठी पुल्लिंग सर्वनाम वापरले जाते.
Eg. The sun, storm, death, time, winter etc.
1) The sun shades his beams.
B) ज्या नामातून सुंदरता, कोमलता, मोहकता व्यक्त होते तेथे स्रीलिंगी सर्वनाम वापरली जातात.
Eg. The moon, The earth, spring, autumn, nature, peace, hope, charity etc.
1) The moon has hide his face behind the cloud.
C) रेल्वे, विमाने, जहाजे यांच्या नावांना देखील स्रीलिंगी सर्वनाम वापरले जाते.
1) The ship lost her way in the stormy sea.
D) समुदायवाचक जसे की committy, jury, family, team इ. नामातील सदस्यात एकवाक्यता असते त्यावेळी क्रियापदा एकवचनी नपुसंकलिंगी वापरावे लागते व सर्वनाम it/ its वापरावे लागते.
1) The team is strong.
2) The jury anonymously gives its decision.
E) परंतु समूहवाचक नामातील सदस्यात मतभिन्नता असेल तर हे अनेकवचनी नामाप्रमाने क्रियापद अनेकवचनी वापरावे व अनेकवचनी सर्वनाम they, them, their वापरावे.
1) The jury were devided on their decision.
2) The team are fighting among themselves.
F) लहान मुले व छोटे प्राणी यांच्या साठी नपुसंक लिंग वापरतात.
1) The dog is barking, take it outside.
2) The baby is crying, please take it.
G) नर जातीचा संकेत देणाऱ्या घटकांना पुल्लिंग मानतात व पुल्लिंग एकवचनासाठी He हे सर्वनाम वापरतात.
Man, Husband, Boy etc.
1) He is a boy
2) He is her husband.
H) मादी जातीचा संकेत देणाऱ्या घटकांना स्त्रीलिंगी मानतात व स्रीलिंगी एकवचनासाठी She हे सर्वनाम वापरतात.
Women, Wife, Girl etc.
1) She is a girl.
2) She is his wife.
I) छोटे प्राणी व पक्षी यांच्या साठी It वापरले जाते कधीकधी मोठ्या प्राण्यासाठी देखील It वापरले जाते परंतु नर किंवा मादी यांचा उल्लेख करण्यासाठी He किंवा She वापरले जाते.
1) It is a dog.
2) It is a crow.
3) An elephant was standing with her calf.
J) देशाचा सांस्कृतिक किंवा राजकीय अर्थाने उल्लेख करायचा असल्यास She वापरावे , भौगोलिक अर्थासाठी It वापरावे
1) America has her own culture.
2) India, it's a big place of land.
K) सामान्य नामांचे लिंग माहित नसल्यास ते पुल्लिंग मानावे.
Teacher, Doctor.
1) The doctor came late.
L) काही पुल्लिंग नामाचे स्रीलिंग करताना - ess लावले जाते.
Lion (सिंह) - Lioness (सिंहीण)
Host (यजमान) - Hostess (यजमानिण/ परिचारिका)
Author (लेखक) - Authoress (लेखिका)
M) काही पुल्लिंगी नामांना ess लावताना शेवटच्या अक्षरा पूर्वीचे स्वर काढले जातात.
Actor (नट) - Actress (नटी)
Waiter (वाढपी) - Waitress (महिला वाढपी)
Hunter (शिकारी) - Huntress (शिकार करणारी स्त्री)
N) काही पुल्लिंग नामाचे स्रीलिंग करताना - ess लावले जात नाही असेही काही शब्द आहेत.
Grandfather (आजोबा) - Grandmother (आजी)
King (राजा) - Queen(राणी)
Uncle (काका) - Aunt (काकू)
Male (पुरुष/ नर) - Female (स्त्री, मादा)
टिप्पणी पोस्ट करा